राहुल गांधींकडून सचिन पायलट यांना भेटीचा निरोप

Rahul Gandhi & Sachin Pilot

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सचिन पायलट यांना चर्चेसाठी बोलावले आहे. आज संध्याकाळी या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत कुठला निर्णय काय होणार, यावर राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे भवितव्य अवलंबून आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पायलट या बैठकीला जातील की नाही, हाच मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. पायलट या बैठकीला गेले तर या सगळ्या नाराजीनाट्यावर पडदा पडेल. मात्र, सचिन पायलट या बैठकीला गेले नाही तर ते आपल्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, राजस्थान काँग्रेसमधली अंतर्गत भांडणं वाढत असल्याचं समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातले मतभेद वाढत चालले आहेत. हरियाणाच्या मानेसरमध्ये काँग्रेसचे १० पेक्षा जास्त आमदार पोहचले आहेत. एवढेच नाही तर पायलट समर्थक अनेक आमदारांचे फोनही बंद आहेत. या आमदारांना दिल्लीला बोलावलं जाऊ शकतं.

या सगळ्या वादामध्येच राजस्थानच्या एसओजीनी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना नोटीस दिली आहे. ही नोटीस मिळाल्यामुळे सचिन पायलट नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या काही आमदारांसोबत दिल्ली गाठली आहे, तर काही आमदार हरियाणामध्ये आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER