राहुल गांधी यांना कोरोनाची लागण; ट्विटवरून दिली माहिती

Rahul Gandhi

नवी दिल्ली :- काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना कोरोना संसर्ग (Corona Virus) झाला आहे. सौम्य लक्षणे दिसू लागल्यानं चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. काही लक्षणे जाणवू लागल्यानंतर कोरोना चाचणी केली. ती पॉझिटिव्ह आली आहे.

माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी सुरक्षेची काळजी घ्या, असे आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी देशात कोरोना संसर्ग वाढत असल्याने त्यांनी बंगालमधील प्रचार सभा रद्द केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button