राहुल गांधी ‘पुन्हा फ्लॉप’; प्रचार केलेल्या ५२ पैकी ४२ जागांवर महागठबंधन मागे

rahul Gandhi

पाटणा : काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) बिहारच्या निवडणुकीत पुन्हा अपयशी ठरले आहेत. राहुलने बिहारमध्ये ८ सभा घेतल्या. त्याचा परिणाम विधानसभेच्या ५२ जागांवर होणे अपेक्षित होते. यातल्या ४२ जागांवर महागठबंधनचे उमेदवार पिछाडीवर आहेत. फक्त १० जागांवर महागठबंधनला आघाडी मिळाली आहे.

बिहार विधानसभेच्या २०१५ च्या निवडणुकीत काँग्रेसने ४० जागा लढवल्या होत्या. २७ जागा जिंकल्या. यंदा ७० जागा लढवल्या मात्र, यातल्या केवळ १९ जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. सध्या एनडीएने आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्ष ७७, तर संयुक्त जनता दल ४३ जागांवर पुढे आहे. राष्ट्रीय जनता दलाचे उमेदवार ६८ मतदारसंघांत आघाडीवर आहेत. काँग्रेस १८ जागांवर पुढे आहे.

बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनचं सरकार येईल, असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्सने वर्तवला होता. तो चूक ठरताना दिसतो आहे. या निवडणुकीत राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. सुमारे २५० सभा घेतल्या होत्या. यादव यांच्या तुलनेत काँग्रेसने फार जोर लावला नाही. त्यामुळेच महागठबंधनला अपेक्षित जागा मिळाला नसल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

निवडणुकीसाठी दिल्लीतून आलेल्या काँग्रेसच्या टीमने राज्यभर दौरे केले. ५९ सभा घेतल्या. राहुल यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात प्रत्येकी चार अशा आठ सभा घेतल्या. राहुल यांनी दुसऱ्या टप्प्यात हिसुआ, कहलगाव, कुशेश्वरस्थान आणि वाल्मिकीनगरमध्ये जनसभा घेतल्या. तर तिसऱ्या टप्प्यात राहुल यांनी कोढा, किशनगंज, बिहारीगंज आणि अररियामध्ये सभांना संबोधित केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER