देशात लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब; राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi criticises PM Modi

नवी दिल्ली :- कोरोनाच्या (Corona Virus) दुसऱ्या लाटेने देशात परिस्थिती गंभीर झाली आहे. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारला (Modi Govt) लक्ष्य केले आहे. देशात लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब झाले आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्राला लगावला आहे.

देशात केवळ सेंट्रल विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि सगळीकडे पंतप्रधानांचा फोटो असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी म्हणतात की, “देशात कोरोनाची लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधानही गायब झाले आहेत. उरलंय ते फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवरील जीएसटी आणि सगळीकडे पंतप्रधानांचे फोटो.”

राहुल गांधी कोरोना परिस्थितीवरून सातत्याने केंद्रावर हल्लाबोल करत असतात. त्यांनी या आधी मोदी सरकारवर टीका करताना म्हटले होते की, “देशभरातील नद्यांमधून हजारो प्रेतं तरंगताहेत, रुग्णालयासमोर भल्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. लोकांच्या जीवनातील सुरक्षेचा हक्क नाकारला जात आहे. पंतप्रधानांनी आपल्या डोळ्यांवरील गुलाबी रंगाचा चष्मा उतरवावा, त्यांना सेंट्रल विस्टाच्या बांधकामाशिवाय काहीच दिसत नाही.”

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या लसीकरण मोहिमेवरही टीका केली आहे. “देशातल्या अर्ध्या लोकसंख्येकडे इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे त्यांना ऑफलाईन बुकिंगचीही सुविधा मिळावी. देशातील कोरोनाचे संकट वाढत असताना पंतप्रधान मात्र गप्प आहेत.” असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button