राहुल गांधी : एक घाबरलेला विद्यार्थी- बराक ओबामा

Barack Obama - Rahul Gandhi

वॉशिंग्टन :- राहुल गांधी (Rahul Gandhi) घाबरलेल्या  विद्यार्थ्यासारखे आहेत; ज्याने आपला अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्याला शिक्षकाला प्रभावित करायचे आहे. परंतु, त्याच्याकडे त्या विषयात प्रावीण्य मिळवण्याची योग्यता नाही किंवा प्रावीण्य मिळवण्यासाठी उत्कटता नाही, असे मत अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी राहुल गांधींबद्दल व्यक्त केले आहे.

बराक ओबामा यांनी त्यांच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या आत्मचरित्रात काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी यांच्याशिवाय सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबद्दलही लिहिले आहे. राहुल गांधी हे ‘नर्व्हस’ आणि सुमार योग्यतेचे नेते आहेत, असे ओबामा म्हणाले आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने ओबामाच्या ‘ए प्रॉमिसिड लँड’चा आढावा घेतला आहे. यात बराक ओबामा यांनी जगभरातील इतरही राजकीय नेत्यांव्यतिरिक्त इतर विषयांवरही भाष्य केले आहे.

सोनिया गांधी

राहुल गांधी यांच्या आई आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्याबद्दल ओबामा म्हणतात – आम्हाला चार्ली क्रिस्ट आणि रहम एमॅन्युअल यांसारखे पुरुष हँडसम असल्याचे  सांगितले  जाते; परंतु महिलांच्या सौंदर्याबद्दल सांगितले जात नाही. यासाठी एक किंवा दोन उदाहरणेच अपवाद आहेत; जसे सोनिया गांधी.

मनमोहन सिंग (Manmohan Singh)

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अमेरिकेचे माजी संरक्षणमंत्री बॉब गेट्स यांच्यात एक खरेपणा आणि प्रामाणिकपणा आहे, असे ओबामा म्हणतात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे मशीन चालवणारे मजबूत आणि धूर्त  बॉस असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

ओबामा यांचं हे पुस्तक १७ नोव्हेंबर रोजी बाजारात येणार आहे. बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात २०१० आणि २०१५ मध्ये भारताचा दौरा केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER