राहुल आवारेने लग्नातही दाखवून दिले ‘कुस्ती हेच पहिले प्रेम’

कुस्तीगिर राहुल आवारेने (Rahul Aware) आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करतानाही कुस्ती हेच आपले पहिले प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. अर्जुन पुरस्कार विजेता राहुल हा रविवारी पुण्यातील बावधन येथे ऐश्वर्या पवार हिच्याशी विवाहबध्द झाला. ऐश्वर्या ही कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांची कन्या आहे.

आपल्या विवाहासाठी राहुलने हातावर जी मेहेंदी काढली होती त्यातसुध्दा आॕलिम्पिकचा पाच वर्तुळांचा लोगो आणि कुस्ती हेच माझे जीवन (Wrestling is my life) असल्याचा संदेश रंगवलेला होता. त्यातुन त्याने आपले कुस्तीप्रेमच दाखवून दिले आहे. अर्थात कुस्ती प्रशिक्षकाची व कुस्तीगिराचीच कन्या असल्याने ऐश्वर्याचाही त्याला आक्षेप असणार नाही अन्यथा दुसरी कुणी असती तर तुमचे लग्न माझ्याशी झालेय की कुस्तीशी…असा टोमणा त्याला ऐकावा लागण्याची शक्यता होती.

राहुल व ऐश्वर्या या नवविवाहीत जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER