राहुल आवाडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Rahul Awade corona postive.jpg

कोल्हापूर : इचलकरंजीचे आमदार माजी मंत्री प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल आवाडे यांचा दीड महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा कोरोना चाचणी (Corona test) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. इचलकरंजी येथील अलायन्स या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती ठीक असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. गेल्या महिन्यात आवाडे कुटुंबीयांतील १८ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती.

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्यासह कुटुंबीयांतील अन्य व्यक्तींचा समावेश होता.या साऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन सगळे घरी परतले. दरम्यान राहुल आवाडे यांना बुधवारी पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घेतली. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर इचलकरंजीत उपचार सुरू आहेत. जिल्ह्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर दुसऱ्यांदा त्याची लागण होणे ही पहिलीच घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER