रहाणेचे शतक म्हणजे भारतीय संघ ‘सेफ

Ajinkya Rahane

अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane). कसोटी सामन्यांमध्ये 12 वे शतक झळकावले आहे आणि त्याच्या या शतकांमध्ये एक शुभसंकेत आहे. अजिंक्यने आधी जी 11 कसोटी शतके झळकावली आहेत त्यापैकी एकही सामना भारताने गमावलेला नाही. हे पाहता आता अजिंक्यने आणखी एक शतक झळकावले असल्याने भारतीय संघ (India) किमान मेलबोर्न (Melbourne test) कसोटी गमावणार तरी नाही असे भाकित आता करता येईल.

रहाणेच्या आधीच्या 11 शतकांपैकी 8 शतकांचे सामने भारताच्या विजयात तर तीन अनिर्णित सामन्यांतील आहेत. त्याच्या या 12 कसोटी शतकांचा तपशील असा…

118 – वि. न्यूझीलंड, वेलिग्टन, 2014
103 – वि. इंग्लंड, लार्डस, 2014
147 – वि. आॕस्ट्रेलिया, मेलबोर्न, 2014
126 – वि. श्रीलंका, कोलंबो, 2015
127 – वि. दक्षिण आफ्रिका, दिल्ली , 2015
100 – वि. दक्षिण आफ्रिका, दिल्ली, 2015 (नाबाद)
108- वि. वेस्ट इंडिज, किंग्स्टन, 2016 (नाबाद)
188 – वि. न्यूझीलंड, इंदूर, 2016
132 – वि. श्रीलंका, कोलंबो, 2017
102 – वि. वेस्ट इंडिज, नाॕर्थ साऊंड, 2019
115 – वि. दक्षिण आफ्रिका, रांची, 2019
104 – वि. आॕस्ट्रेलिया, मेलबोर्न, 2020

दरम्यान, मेलाबोर्नवर दोन शतके करणारा अजिंक्य रहाणे हा केवळ दुसराच भारतीय आहे. पहिले भारतीय विनू मांकड आहेत ज्यांनी 1948 मध्ये एमसीजीवर दोन्ही शतके केली होती. म्हणजे तब्बल 72 वर्षानंतर कुण्या भारतीय फलंदाजाने मेलबोर्नवर दुसरे कसोटी शतक झळकावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER