
मेलबोर्न कसोटीतील (Melbourne Test) विजयासह अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा ऑस्ट्रेलियात (Australia) शतकी खेळी करणारा पहिला विजयी कर्णधार ठरला. कर्णधार म्हणून पहिले तीन कसोटी सामने जिंकणारा धोनीनंतरचा (MS Dhoni) पहिलाच भारतीय कर्णधार ठरला, ऑस्ट्रेलियात विजयी धाव करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला. हे विक्रम तर झालेच पण रहाणेने आणखी एक विक्रम असा केलाय ज्यात त्याने डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
तो विक्रम म्हणजे ज्या सामन्यात एका संघातर्फे दोन्ही डावात एकही अर्धशतक लागले नाही पण त्याच सामन्यात दुसऱ्या संघातर्फे एखाद्या फलंदाजाने शतकी खेळी केली. अजिंक्य रहाणे व सर डॉन ब्रॅडमन यांनी अशी प्रत्येकी सर्वाधिक चार शतके झाळकावली आहेत.
मेलबोर्न कसोटीत दोन्ही डावात मिळून ऑस्ट्रेलियन फलंदाजांची सर्वोच्च खेळी मार्नस लाबुशेनच्या 48 धावांची होती तर अजिंक्य रहाणेने 112 धावांची खेळी केली. अशा प्रकारचे रहाणेचे हे चौथे शतक आहे.
अशा शतकी खेळी
- 4- सर डॉन ब्रॕडमन
- 4- अजिंक्य रहाणे
- 3- काॕलीन काऊड्री
- 3- जेकस् कॕलिस
- 3- गाॕर्डन ग्रिनीज
रहाणेची ही चार वैशिष्ट्यपूर्ण शतके अशी
- 112- वि. आॕस्ट्रेलिया, मेलबोर्न, 2020
- 102- वि. वेस्ट इंडीज, नाॕर्थ साऊंड, 2019
- 127-.वि. दक्षिण आफ्रिका, दिल्ली, 2015
- 100- वि. दक्षिण आफ्रिका, दिल्ली, 2015
ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकणारी धाव करणाऱ्या पाहुण्या कर्णधारांमध्ये रहाणेशिवाय आर्थर श्रुस्बरी (1884),आर्ची मॕक्लारेन (1897), माईक ब्रेअर्ली (1979) आणि क्लाईव्ह लाॕईड (1982) यांचा समावेश आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला