रघुवंश प्रसाद सिंह गरिबांचे मसीहा होते : राज्यपाल

Raghuvansh Prasad Singh - Governor Bhagat Singh Koshyari

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधानाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. सिंह हे व्यापक जनाधार असलेले मेधावी संसदपटू होते. कुशल वक्ता असलेल्या रघुवंश प्रसाद सिंग यांनी बिहार तसेच देशातील जनतेची निष्ठेने सेवा केली. रघुवंश प्रसाद सिंह (Raghuvansh Prasad Singh ) यांचा माझा घनिष्ठ परिचय होता. त्यांच्या निधनामुळे देशाने एक उत्कृष्ट संसदपटू तसेच गरिबांचा मसीहा गमावलेला आहे. ईश्वर मृतात्म्याला शांती देवो अशी प्रार्थना करतो. तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवितो, असे राज्यपालांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER