भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात : रघुराम राजन

Raghuram Rajan

नवी दिल्ली : भारतासमोर आधीच आर्थिक संकट असताना कोरोना व्हायरसने मोठा फटका दिला आहे. कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटात असल्याचा इशारा दिला आहे.

‘भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टप्प्यात आहे. सरकारने हे आव्हान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घेतली पाहिजे, असे मत रिझ्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. एकीकडे कोरोनाचे थैमान सुरू असताना आर्थिक आघाडीवरही भारताला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, हे आता स्पष्ट आहे.

देशात करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल रघुराम राजन यांनी खास ब्लॉग लिहिला असून, त्यात त्यांनी सरकारला पुढील संकटाबद्दल सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे.