रघुनाथ चांदोरकर हे आता जगातील सर्वाधिक वयाचे हयात क्रिकेटपटू

न्यूझीलंडचे (Newzealand) प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आणि दुसऱ्या विश्वयुध्दात लढलेले ऍलन बर्जेस (Allan Burgess) यांचे बुधवार, 7 डिसेंबर रोजी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 100 वर्षे 250 दिवस होते.

त्यांच्या निधनानंतर आता महाराष्ट्र (Maharashtra) व मुंबईसाठी खेळलेले रघुनाथ चांदोरकर (Raghunath Chandorkar) हे सर्वाधिक वयाचे हयात क्रिकेटपटू ठरले आहेत. चांदोरकर यांचा वय आता 100 वर्षे 47 दिवस आहे. त्यांनी गेल्या 21 नोव्हेंबरला आपली शतकपूर्ती केली होती.

100 वर्षे 250 दिवस आयुष्य लाभलेले ऍलन बर्जेस
(Alan Burgess) यांनी 1941-42 ते 1951-52 या काळात कँटरबरी संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. त्यांनी 14 सामन्यात 466 धावा केल्या आहेत आणि 16 विकेट काढल्या आहेत. बर्जेस यांच्यापेक्षाही अधिक आयुष्य लाभलेले 17 प्रथम श्रेणी क्रिकेटपटू होऊन गेले आहेत.

बर्जेस यांचे रँजिओरा येथील ज्येष्ठांसाठीच्या निवारागृहात झोपेतच निधन झाल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने बुधवारी म्हटले आहे. त्यांचा जन्म 1 मे 1920 रोजी ख्राईस्टचर्च येथे झाला होता. ते उजव्या हाताने फलंदाजी व डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. दुसऱ्या महायुध्दात 1945 मध्ये न्यूझीलंड सेनादलासाठी इंग्लंडमध्ये त्यांनी रणगाडा चालकाची जबाबदारी पार पाडली होती. बर्जेस यांचे वडीलसुध्दा पहिल्या विश्वयुध्दात सहभागी होते आणि ते क्रिकेट पंचसुध्दा होते. अॕलन बर्जेस यांनी आपल्या पदार्पणाच्या सामन्यात ओटॕगोविरुध्द पहिल्या डावात 5 व दुसऱ्या डावात 3 बळी मिळवले होते.

न्यूझीलंड क्रिकेटने त्याआची मुलगी पिप हिच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार अॕलन बर्जेस हे अखेरपर्यंत सुस्थितीत होते. मंगळवारी त्यांनी न्यूझीलंड व पाकिस्तानदरम्यानच्या कसोटीचा खेळही टेलिव्हिजनवर पाहिला.

बर्जेस यांच्या निधनानंतर आता ओटॕगो संघासाठी खेळलेले लेन गॕलावे हे न्यूझीलंडमधील सर्वाधिक वयाचे हयात क्रिकेटपटू आहेत. त्यांचे वय 98 वर्षे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER