भूमिकेच्या तयारीसाठी गेली असताना या अभिनेत्रीबरोबर झाले होेते रॅगिंग

आदिती पोहनकर

कलाकारांना जेव्हा एखादी भूमिका ऑफर केली जाते तेव्हा त्या भूमिकेची आणखी माहिती घेण्यासाठी किंवा तशा व्यक्तीरेखा कशा वागतात, बोलतात, चालतात याची माहिती घेण्यासाठी कलाकार तशा व्यक्तींकडे जातात. काही दिवस त्यांच्यासोबत राहून शिकतात आणि नंतर त्याप्रमाणे भूमिका साकारतात. परंतु कधी कधी अशावेळी कलाकारांना वाईट अनुभवांनाही सामोरे जावे लागते. असाच काहीसा अनुभव अभिनेत्री आदिती पोहनकरला (Aditi Pohankar) आला. सध्या आदिती आश्रम या वेबसीरीजमध्ये कुस्ती खेळाडू पम्मीची भूमिका साकारीत आहे. स्वतः आदितीनेच तिच्यावर झालेल्या रँगिंगची (Ragging) माहिती दिली.

Actress Aaditi Pohankar Photoshoot Stills | New Movie Postersआदितीनेे सांगितले, मला या मालिकेत कुस्ती खेळाडूची भूमिका साकारायची असल्याने मी हरयाणातील महिला कुस्तीपटूंचे जीवन कसे असते ते पाहायला गेले होते. मी त्यांच्याशी बोललो, त्या कुस्ती कशा करतात ते पाहिले, त्यांचे डावपेच पाहिले. त्यानंतर त्या हॉस्टेलमध्ये कशा राहतात ते पाहाण्यासाठी त्यांच्या हॉस्टेलवर गेले.

परंतु तेथे गेल्यानंतर मी नवीन कुस्ती खेळाडू आहे असे वाटल्याने तेथील सीनियर मुलींनी माझे रँगिंग केले. काही मुलींनी माझ्यावर वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती केली तर काही मुलींनी माझ्या अंगावर चक्क गरम पाणीही टाकले. परंतु मला त्याचे वाईट वाटले नाही.

कारण माझ्या भूमिकेसाठी असे अनुभव आवश्यक होते असेही आदितीने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER