राफेलची संहारक क्षमता अनेक पटीने वाढणार

नवी दिल्ली : भारतीय वायूदलात (Indian Air Force) नव्यानेच दाखल झालेल्या राफेल (Rafale) लढाऊ विमानांची संहारक क्षमता अधिक वाढणार आहे. सध्याची परिस्थिती बघता भारताला पश्चिमी आणि पूर्व आघाड्यांवर एकाचवेळी लढण्याची वेळ येऊ शकते. त्यावेळी राफेल विमानांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.

राफेलची निर्मिती करणाऱ्या दसॉल्ट या फ्रेंच कंपनीने राफेलमध्ये असणाऱ्या स्कॅल्प लाँग रेंज क्रुझ क्षेपणास्त्रासाठीचे सॉफ्टवेअर दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता हे सॉफ्टवेअर अद्ययावत झाल्यानंतर राफेल विमानांची संहारक क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. राफेल विमान हजार किलोमीटर अंतरावरुनही शत्रुचे तळ उद्ध्वस्त करु शकेल. स्कॅल्प सॉफ्टवेअरशिवाय राफेल विमानांमधील हॅमर क्षेपणास्त्रांचीही नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आली.

राफेलमध्ये असणारे स्कॅल्प लाँग रेंज क्रुझ क्षेपणास्त्र अपग्रेड झाल्यानंतर समुद्राच्या तळापासून 4000 मीटर उंचीवर असणाऱ्या लक्ष्याचाही अचूक भेद करू शकते. तसेच या क्षेपणास्त्राची रेंज 300 किलोमीटरवरून 450 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. 2021 पर्यंत भारतीय वायदूलाला तीन नवीन राफेल जेट मिळणार आहेत. स्कॅल्प क्षेपणास्त्रांच्या अपग्रेडशनमुळे राफेलची ताकद शतपटींनी वाढणार आहे.

आगामी काळात चीनसोबत युद्ध झाल्यास राफेल विमानांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरु शकते. सध्या राफेलची एक स्क्वाड्रन अंबाला येथे आहे तर दुसरी स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हाशिमरा तळावर असेल. हाशिमरा तळ चीनच्या सीमेपासून काही अंतरावर असलेल्या सिलिगुडीनजीक आहे. एप्रिल 2021 पर्यंत भारतीय वायूदलाकडे 36 राफेल विमानांची स्क्वाड्रन सुसज्ज असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER