नदाल निवृत्त झाला, पण….

Rafael Nadal

सारख्या सारख्या नावाने बऱ्याचदा गोंधळ होतो. त्यातूनकाही मजेशीर गोष्टीसुध्दा घडत असतात. अलीकडेच कोरोनामुळे लॉकडाऊन व सोशल डिस्टन्सिंगचे बंधन आल्यापासून ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी झूम अँप जोरात आहे, पण या नावावरुन शेअर बाजारात मोठाच घोळ झाला. झूम नावाची एक एअरलाईन कंपनी आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे झूम आणि ही दुसरी झूम कंपनी एकच असल्याचे समजून नामसाधर्म्यामुळे झूम एअरलाईन्सचा शेअर खूप वधारला. आणि ज्या झूम अँपचा शेअर वाढायला हवा होता तो मात्र तेवढा पाहिजे तेवढा वाढला नाही. आपल्याकडेही महाभारतात या संदर्भात ‘नरो वा कुंजरोवा’ हा प्रसंग सर्वांना माहितच आहे.

ही बातमी पण वाचा:- धनवान खेळाडूंच्या यादीत विराट कोहली ६६ व्या स्थानी

आता पुन्हा एकदा तसेच घडले आहे आणि यावेळी त्यामुळे ‘नदाल’ आणि ‘निवृत्ती’ हे दोन मुद्दे अचानक सोशल मीडियावर ट्रेंडींग झाले. नदाल व निवृत्ती हे दोन शब्द ऐकल्यावर तुमची-आमची जी प्रतिक्रिया उमटेल तीच जगभरातून उमटली. लोकांना वाटले की क्ले कोर्टचा बादशहा स्पॕनिश टेनिसपटू राफेल नदालनेच निवृत्ती घेतली. साहजिकच राफेल नदालने अचानक निवृत्तीचा निर्णय कसा घेतला हा चर्चेचा विषय बनला पण वस्तुस्थिती वेगळीच होती.

मग वस्तुस्थिती काय होती? राफेल नदाल निवृत्त झाला नव्हता तर कोणत्या नदालने निवृत्ती घेतली होती? तर घोड्यांच्या शर्यतीत अपराजीत राहिलेल्या ‘नदाल’ नावाच्या घोड्याला निवृत्त करण्यात आले होते.

अमेरिकन वृत्तवाहिनी सीबीएसचा प्रतिनिधी अँडम वेनर हा हॉर्स रेसिंग व टेनिस दोघांचाही चाहता! त्यामुळे त्याने प्रतिक्रिया दिली की, नदाल कोणताही असो, त्याच्या निवृत्तीची चर्चा ही काही चांगली बाब नाही. नदाल निवृत्त झाला पण तो घोडा आहे, टेनिसपटू नाही हे लोकांना जेंव्हा समजले तेंव्हा तो गमतीचा विषय झाला,आणी सोशल मीडियावर त्या विषयावरील मीमचा पूर आला.

बरं आता नदाल घोडा अपराजित असताना का निवृत्त झाला? तर या नदालच्या गुडघ्याला दुखापत झाली म्हणून त्याला निवृत्त करण्यात आले. या तीन वर्षांच्या विजेत्याचे प्रशिक्षक बॉंब बॉंफर्ट यांनी सांगितले की, त्याच्या डाव्या पायाला फॅक्चर झाले आहे आणि शस्त्रक्रिया करुन त्याच्या गुडघ्यात दोन स्क्रू टाकावे लागले आहेत.

टेनिसपटू राफेल नदालबाबत नामसाधर्म्यामुळे दुसऱ्यांदा असा गमतीशीर प्रसंग घडला आहे. यापूर्वीही भारतीय राजकारणात राफेल शस्रास्र कराराचा वाद पेटला होता तेंव्हासुध्दा नदाल राफेल नावामुळे चर्चेत आला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER