राधे माँ बिग बॉसच्या घरात; संन्यासिनी आणि संत समितीची आखाडा परिषदेकडे तक्रार

Bigg Boss

मुंबई : राधे माँ (Radhe Maa) यांनी बिग बॉसच्या (Big Boss) घरात जाणे संत परंपरेला अनुसरून नाही, असा आक्षेप घेत गाझियाबादच्या शिवशक्ती धाममधल्या सन्यासिनींनी आणि अखिल भारतीय संत समितीने आखाडा परिषदेकडे तक्रार केली आहे. कलर्स वाहिनीचा बिग बॉस सिझन 14 चा प्रोमो प्रसारित होताच राधे माँ पुन्हा चर्चेत आल्या. प्रोमोमध्ये त्या बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना घराला आशीर्वाद देताना दिसत आहेत. त्या म्हणाल्या – “ये घर हमेशा बना रहे. बिग बॉस इस बार बहुत चले”.

मात्र, राधे माँयांनी या कार्यक्रमात भाग घेणे काही संन्यासिनींना पटले नाही. याचा निषेध म्हणून काही सन्यासिनींनी एक दिवसाचा उपवास केला आणि राधे माँवर कारवाई करण्याची मागणी आखाडा परिषदेकडे केली. गाझियाबादच्या शिवशक्ती धाममधल्या सन्यासिनींनी अखिल भारतीय संत समिती आणि आखाडा परिषदेकडे याविषयीची तक्रार केल्याची माहिती मीडिया रिपोर्टमध्ये आहे. स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्याने बिग बॉसच्या घरात जाण्याने संत परंपरेचा अपमान झाला असे मत अनेकांनी व्यक्त केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER