राधानगरी धरण ओव्हरफ्लो : व्हिडिओ पहा

Kolhapur

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. जिल्ह्यात धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. पंचगंगा नदी 43 पोटावरून हात असून ती धोक्याच्या पातळीवर आहे. जिल्ह्यातील मुख्य धरण राधानगरी ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या धरण ९७ टक्के भरले आहे. धरणातून १४०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडतील अशी स्थिती आहे.

त्यामुळे पंचगंगा नदी कडेच्या सर्व गावांतील लोकांना सतर्क व सुरक्षित राहण्याची सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वारणा धरण पुर्ण क्षमतेने भरले असून धरणातून १४०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे वारणा नदीकडेच्या सर्व गावांतील लोकांना सतर्क व सुरक्षित राहण्याची सूचना दवंडीने द्यावा, अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER