राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये येणार, हसन मुश्रीफ यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर :- काँग्रेसमधून भाजपात आलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे- पाटील लवकरच पुन्हा काँग्रेसमध्ये परत येतील, गौप्यस्फोट ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये असताना विरोधीपक्ष नेतेपद सोडून, राधाकृष्ण विखे-पाटील भाजपात आले होते. ते परत भाजपा सोडून महाविकास आघाडीत येतील, अशी चर्चा तीन दिवसांपासून सुरू होती. या पृष्ठभूमीवर, ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शुक्रवारी हा गौप्यस्फोट केला.

भाजपाने बी टीमला सक्रिय केले; वारिस पठाण यांच्या वक्तव्यावरून जयंत पाटलांची टीका

अहमदनगर येथे आज ग्राम विकासमंत्री हसन मुश्रीफ यांची पत्रपरिषद झाली. विखे-पाटील हे मूळचे काँग्रेसच्या विचारांचे असून, त्यांना नाईलाजाने भाजपामध्ये जावे लागले, असा दावा पत्रपरिषदेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी यावेळी केला.
भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर मुश्रीफ यांनी यावेळी निशाणा साधला. दोन्ही नेते सत्ता गेल्याने महाविकास आघाडीवर सतत टीका करीत आहेत, असे मुश्रीफ म्हणाले.