
अहमदनगर : काँग्रेसचे (Congress) नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यात काँग्रेसला नंबर एकचा पक्ष बनवण्याची घोषणा केल्यानंतर राजकारणात काही नाट्य घडण्याची अपेक्षा होती. नाट्य घडले, पण त्यात काँग्रेसलाच धक्का बसला! काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या जोर्वे गावातील सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जोर्वेचे सरपंच रवींद्र खैरे हे बाळासाहेब थोरात यांच्या गटात होते. ते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यासोबत भाजपात गेल्याने काँग्रेस आणि थोरात यांना धक्का बसला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला