जनाची नाही, मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा’, विखे पाटलांचा काँग्रेसला टोला

radhakrishna-vikhe-patil-slams-rahul-gandhi

अहमदनगर : एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट अधिकच वाढत असताना दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींचे विधान दुटप्पीपणाचे आहे. काँग्रेस सत्तेसाठी लाचार झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार नाही. त्यामुळे जनाची नाही, मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाला लगावला आहे.

ही बातमी पण वाचा:- पवारांचा शब्द खरा ठरला; ‘ठाकरे’ सरकार स्थिर, राहुल गांधी यांच मुख्यमंत्र्यांना आश्वासन

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, काँग्रेस दोन्ही बाजूने ढोलकी वाजवत आहे. सत्तेत राहून मलीदा चाखण्याचं काम काँग्रेसकडून सुरु आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यातील जनता हवालदिल झालेली असताना मंत्री मात्र गायब झाले आहेत. काँग्रेसचे मंत्री मुंबईत जावून का थांबलेत..? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कोरोनामुळे राज्याच्या झालेल्या अवस्थेला शिवसेना, राष्ट्रवादी सोबत काँग्रेसही तितकीच जबाबदार असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला आहे.

कोरोनाचं संकंट निवारण्यात उद्धव ठाकरे सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. राज्यातील जनता कोरोना संकंटात होरपळी जात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री केवळ ‘फेसबुक’वरूनच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का?, असा खोचक सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांकडे दुर्लक्ष करून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधीचा योग्य उपयोग राज्य सरकार करत नाही, असा गंभीर आरोप विखे पाटलांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER