उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा देणं ही वादळापूर्वीची शांतता असू शकते : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil - Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेचा (Shiv Sena) एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आत्तापासूनच तयारीला लागा” असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) मंगळवारी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिले.यावर भाजपाचे (BJP) नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी वक्तव्य केले.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला स्वबळाचा नारा ही वादळापूर्वीची शांतता असू शकते , असे विखे पाटील म्हणाले आहेत.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर ती माझ्या शिवसैनिकांनी पाडली असं गर्वाने सांगितलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले आहे. तसंच सत्ता टिकवण्यासाठी सगळी तत्वे गुंडाळून ठेवली आहेत. असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

एवढंच नाही तर केंद्र सरकारवर सातत्याने करण्यात येणाऱ्या टीकेवरुनही राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. जर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता? ” असाही प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांनी विचारला आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे (NCP) पक्षप्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनीही उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३० ते ३५ वर्षे ऐकतोय आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याची ही पद्धत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER