‘नाचता येईना अन अंगण वाकडं’ अशी राज्य सरकारची गत; एसीबी कारवाईवरुन राधाकृष्ण विखेंची टीका

Radhakrishna Vikhe

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीवर भ्रष्टाचार विरोधी विभागाने (ACB) कारवाई केल्या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला .

‘नाचता येईना अन अंगण वाकडं’ अशी राज्य सरकारची गत आहे. कितीही दहशत निर्माण केली तरी सत्य लपणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

चित्रा वाघ याच्या पतीवर भ्रष्टाचार विरोधी विभागाने (ACB) कारवाई केल्या प्रकरणी बोलताना विखे म्हणाले, नाचता येईना अन अंगण वाकडं अशी राज्यसरकारची गत झालीय. त्यामुळे एसीबीचा धाक दाखवणं किंवा इतर पद्धतीने भीती दाखवण्याचा प्रकार आहे. पण सरकारने कितीही दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी सत्य लपणार नाही, असेही मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले .

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, “संजय राठोड प्रकरणी सगळे पुरावे समोर आहेत. एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीत पोलीस ज्या तत्परतेने गुन्हा दाखल करतात, इथं तर एका मुलीचा मृत्यू झालाय. ती आत्महत्या नसून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे. त्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण तसं झालेलं नाही. पोलीस निर्ढावल्यासारखे वागत आहेत. पोलीस कुणाच्या इशाऱ्यावर असं वागत आहेत? संजय राठोड यांच्याकडे नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःहून तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. किंवा सरकारकडे नैतिकता शिल्लक असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांची हकालपट्टी करावी, असेही पाटील म्हणाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER