राधाकृष्ण विखे, जयदत्त क्षीरसागर, विजयसिंहदादा यांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी

Mantripadachi Lottery

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होत आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल अनुकूल लागल्यास बंडखोरांची दिवाळी आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करणाऱ्या विरोधी पक्षातील बंडखोर नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे जूनच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याचे योजिले आहे.

ही बातमी पण वाचा:- पवारांना करायचे आहे सुप्रियाला मुख्यमंत्री 

मुलाला भाजपमध्ये पाठवून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर पाणी सोडणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कृषी खाते दिले जाईल. मराठवाड्यातील दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांनाही महत्त्वाचे खाते दिले जाईल.

विजयसिंहदादा मोहिते पाटील यांनाही मोठे खाते द्यावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला मदत करणाऱ्यांना ‘बक्षिसी’ देऊन मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागतील, अशी चर्चा रंगली आहे.

ही बातमी पण वाचा : चार आमदारांचे राजीनामे मंजूर