बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघातच विखे पाटलांचं संपर्क कार्यालय सुरू!

radhakrishana-vikhe-patil-balasaheb-thorat

शिर्डी : एकमेकांचे राजकीय विरोधक असलेल्या विखे – थोरात यांच्यात आता राजकीय संघर्ष आणखी वाढतांना पाहायला मिळत आहे . काँग्रेसला रामराम ठोकत थेट मंत्रिमंडळात दाखल झालेल्या राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरातांविरोधात उघड भूमिका घ्यायला सुरूवात केली .

यापार्श्वभूमीवर थोरातांना शह देण्यासाठी विखेंनी थोरातांच्या संगमनेर मतदारसंघात संपर्क कार्यालय सुरू केलं आहे. यावरून ऐन विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्याच गडाला सुरूंग लावण्याची तयारी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुरु केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .

दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन दिग्गज नेत्यातील गटबाजीचे भांडण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच ऐरणीवर आले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे जाहीर वाभाडे काढून वस्रहरण केले.

‘गुर-गुर थांबवा; महागात पडेल असा सज्जड इशारा थोरात यांनी दिला तर थोरात यांच्यावर ‘वाळू माफिया’ असा आरोप विखे यांनी केला. या दोन्ही नेत्यामधील राजकीय संघर्ष येत्या विधानसभा निवडणुकीत आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.