‘अमित शहा खुनी हैं’ या घोषणेने सभागृहात राडा; सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने

Anil Parab & Devendra Fadnavis

मुंबई :- मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्युप्रकरणाचे पडसाद आज अधिवेशनात उमटले. मनसुख हिरेन यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वझे यांनी हत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकच शाब्दिक खळबळ उडाली.

दरम्यान, ‘अमित शहा खुनी हैं ’ या घोषणेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्युप्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणावरून सचिन वझे यांच्या नावाचा उल्लेख करत अटकेची मागणी केली. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) म्हणाले की, ‘ज्यांच्या मृत्यूसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली आहे, ती योग्य आहे; पण सात वेळा खासदार राहिलेल्या मोहन डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये ज्यांची नवे आहे, त्यांनाही अटक झाली पाहिजे.” अशी मागणी परब यांनी केली.

“मोहन डेलकर यांची सुसाईड नोट माझ्या हातात आहे, त्यात कोणाचेही नाव नाही. वझे यांना वाचवण्याकरिता डेलकरांचे नाव पुढे केले जात आहे.” असा पलटवार फडणवीस यांनी केला. त्यानंतर सत्ताधारी आणि भाजपाच्या आमदारांमध्ये एकच गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे सदस्य वेलजवळ आले आणि घोषणाबाजी केली. नाना पटोले म्हणाले की, “त्या ठिकाणी स्फोटकांनी भरलेली गाडी कशी जाऊ शकते, त्यांना तीन स्तरीय सुरक्षा आहे.

महाराष्ट्र एटीएस सगळ्यात चांगले आहे. मोहन डेलकर विद्यमान खासदार आहेत, तरी गुन्हा कसा दाखल होत नाही? हे सगळे संशयास्पद आहे.” दरम्यान, सभागृहात ‘अमित शहा खुनी हैं’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. गोंधळामुळे अर्धा तास सभागृहाचे कामकाज पुढे ढकलण्यात आले. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला अजित पवार, देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख, अनिल परब उपस्थित होते. त्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे गेले.

ही बातमी पण वाचा : मनसुख हिरेन यांना मारून खाडीत फेकले; फडणवीसांचा आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER