बहुमत असूनही भाजपात महापौरपदासाठी चढाओढ

Pimpri-mahapalika

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत असूनही महापौर आणि उपमहापौरपद कोणाला द्यायचं, याचा निर्णय अजूनही झालेला नाही. निकाल लागून तब्बल २ आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे या भाजपमधल्या दोन गटांमध्ये महापौरपदावरून रस्सीखेच सुरु आहे. आता महापौरपदाच्या उमेदवाराची निवड थेट मुख्यमंत्र्यानाच करावी लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीचा गढ उध्वस्त करत पिंपरी चिंचवड महापालिकेवर भाजपने बहुमताने सत्ता काबीज केली. मात्र सत्ता संभाळण्याआधीच पिंपरीत भाजपची गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. सत्तेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे या शहरातील २ आमदार आता एकेमकांवर कुरघोडोच राजकारण करू लागलयेत, त्यामुळेच अजून महापौराची निवड पक्की होत नाहीये.

किल्ले शिवनेरीवर शपथविधी सोहळ्याची ही दृश्य बघुन कुणालाही पिंपरीत भाजप मधील एकोप्याचा हेवा वाटेल, पण जरा थांबा. शपथ घेणारे हे एवढे सगळे नगरसेवक केवळ आमदार महेश लांडगे यांचेच समर्थक आहेत, आणि त्यामुळे शपथविधी ऐवजी हे शक्तिप्रदर्शन आहे, हे वेगळ सांगायला नको.

शक्तिप्रदर्शनचीही चढाओढ आणखी काही दिवस सुरू राहील. पण बाहेरुन आलेले महेश लांडगे पिंपरी-चिंचवडमधील भाजपवर आपली पकड मजबूत करणार, की अंतर्गत वादात भाजप पोखरली जाणार ते बघाव लागेल.