एकनाथ खडसेंबद्दल चंद्रकांत पाटील म्हणाले… रात गयी, बात गयी!

Eknath Khadse-Chandrakant Shinde

मुंबई : भाजपला धक्का देत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला . यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज बोलणं टाळलं. ‘रात गयी, बात गयी…’ एवढीच प्रतिक्रिया पाटील यांनी खडसेंबाबतच्या प्रश्नावर दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज पुण्यात अटल बस सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला. मात्र, त्यांनी काहीही बोलणं टाळलं. खडसे हा विषय आता संपला आहे, असंच त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केले .

दरम्यान एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश सोहळ्याच्या भाषणात बोलताना खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये आपल्यावर झालेला अन्याय व कटकारस्थानाचा पाढा वाचला. माझी ताकद काय आहे हे जळगावात मेळावा घेऊन दाखवून देईन, असा इशाराही खडसे यांनी दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER