आर.आर. आबांनी आडवी, उभी केलेली दारुची बाटली या सरकारने रिचवलीच – चित्रा वाघ

CM Uddhav Thackeray - Chitra Wagh

मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या काळात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेली दारूबंदी अखेर महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) उठवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

दारूबंदीची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणावर अपयशी ठरली असून, जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू आणि बनावट दारू काळ्या बाजारात उपलब्ध होत आहे. ही दारू अतिशय घातक आहे. यातून दारूचा काळाबाजार देखील वाढला आहे. शासनाचे वैध दारू विक्रीमधून मिळणाऱ्या महसूलाचे मोठे नुकसान झाले आहे व गुन्हेगारी क्षेत्रातील खासगी व्यक्तींचा प्रचंड आर्थिक फायदा झाला आहे. बेकायदेशीर दारू व्यापारात स्त्रिया आणि मुले यांच्या वाढत्या सहभागामुळे चिंता निर्माण करण्यासारखी परिस्थिती झाली आहे. तसेच, दारुबंदीच्या बाबतीत बहुसंख्य संघटना, नागरिक व रहिवाशांनी दारुबंदी मागे घेण्याच्या बाजुने कौल दिला असल्याने दारूबंदी उठवण्यात आली आहे. मात्र या निर्णयावर भाजपाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यासंदर्भात ट्वीट करून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी दारूबंदीसाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून देत चित्रा वाघ (Chitra Wagh) यांन राज्य सरकारवर टीका केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्वीटरमधून राज्यातील महिला वर्गाला आवाहन केलं आहे. ‘दिवंगत नेते आर. आर. आबा यांनी उभी बाटली, आडवी बाटली करत आणलेली दारूबंदी या सरकारने शेवटी रिचवलीच. भगिनींनो, संसार वाचवायला कंबर खोचून उभ्या राहा. परत चार हात करायची वेळ आणली या सरकारने आपल्यावर’, असं ट्वीट करत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button