कोविडशी लढाईसाठी रविचंद्रन अश्विनने आयपीएल सोडले

Maharashtra Today

दिल्ली कॕपिटल्सचा (DC) फिरकी गोलंदाज, अष्टपैलू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने कोविडशी (Covid-19) लढाईसाठी आयपीएल(IPL) सोडले आहे. यंदा यापुढच्या आयपीएल सामन्यांसाठी आपण उपलब्ध असणार नाही असे त्याने स्पष्ट केले आहे. दिल्ली कॕपिटल्ससाठी हा फार मोठा धक्का आहे कारण अश्विन हा कोणत्याही संघासाठी मॕचविनर खेळाडू आहे.

यासंदर्भात त्याने रविवारच्या आपल्या व्टिटमध्ये म्हटलेय की, यंदाच्या आयपीएलमध्ये मी उद्यापासून नसेल. माझे कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांचा कोविड 19 शी लढा सुरू आहे आणि अशा कठीण प्रसंगी मी त्यांच्यासोबत राहू इच्छितो, त्यांना मदत करू इच्छितो. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर मी पुन्हा खेळायला येईन. धन्यवाद @दिल्लीकॕपिटल्स.

अश्विनच्या कुटुंबातील नेमकी कुणाला कोरोनाची बाधा झालीय ते स्पष्ट झालेले नाही पण त्याच्या अगदी जवळची व्यक्ती बाधितझाली असल्याचे समजते.

या ट्विटनंतर दिल्ली कॕपिटल्सनेही खंबीरपणे त्याच्या पाठिशी उभे राहात म्हटलेय की, या कठीण समयी आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. या संकटाशी लढायची तुला व तुझ्या कुटुंबाला ईश्वर ताकददेवो. दिल्ली कॕपिटल्समधील आमच्या सर्वांच्या प्रार्थना तुझ्यासोबत आहेत.

कोविड-19 च्या संकटामुळे यंदाच्या आयपीएलमधून माघार घ्यावी लागलेला अश्विन हा पहिला भारतीय क्रिकेटपटू आहे. आयपीएलचे सामने बायोबबल मध्ये खेळले जात आहेत. त्यामुळे त्याने काही दिवसांनी पुन्हा खेळायचा निर्णय जरी घेतला तरी त्याला काही दिवस क्वारंटीन रहावे लागणार आहे.

आपल्या या ट्विटच्या आधीही अश्विनने कोरोनासंदर्भात चिंता व्यक्त करणारे एक ट्विट केले होते. त्यात त्याने म्हटले होते की, देशभरात जे काही होतेय ते बघून फार दुःख होतेय. मी वैद्यकीय क्षेत्रातील नाही पण त्या क्षेत्रातील योध्द्यांप्रती मी आभार व्यक्त करतो. प्रत्येकाने काळजी घ्या आणि सुरक्षित राहा असे मी समस्त भारतियांना आवाहन करतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button