‘ही सवय सोडा !’ ज्योतिरादित्य शिंदेंचा शरद पवारांना टोमणा

Jyotiraditya Shinde scolds Sharad Pawar

नवी दिल्ली :- देशात सध्या कृषी कायद्यावरून वाद-विवाद सुरू आहेत. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना या संदर्भात भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी राष्ट्रवादीचे शरद पवारांना सोईप्रमाणे भूमिका बदलण्याची सवय सोडा, असा टोमणा मारला.

याचा संदर्भ असा, शरद पवार (Sharad Pawar) कृषिमंत्री असताना त्यांनी २०१० मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात त्यांनी एपीएमसी कायद्याचा उल्लेख केला होता. आणि आता ते याबाबत आपली भूमिका बदलत आहेत. यावरून ज्योतिरादित्य शिंदेंनी पवारांना टोमणा मारला, ही सवय आता सोडा.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या त्या पत्रात कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागीदारी गरजेची असून यासाठी एपीएमसी कायद्यात संशोधन झाले पाहिजे, असे म्हटल्याची आठवण ज्योतिरादित्यांनी शरद पवारांना करून दिली.

ही बातमी पण वाचा : इंदिराजींसारख्या बड्या नेत्यालाही लोकांनी धडा शिकवला – शरद पवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER