चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच पदवीधरांचे प्रश्न प्रलंबित : जयंत पाटील

Chandrakant Patil - Jayant Patil

कोल्हापूर : गेल्या बारा वर्षात पदवीधरांचा एकही प्रश्न भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोडवला नाही. जेव्हापासून त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला सुरुवात केली त्यावेळी पासून पदवीधरांच्या होत्या त्या नोकऱ्या देखील गेल्या. पंचवीस वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नव्हती एवढी बेरोजगारी भाजप सरकारच्या दोन वर्षाच्या काळात वाढली आहे. देशाचे आर्थिक गणित कोलमडले असून देशात नव्याने गुंतवणूक झाली नाही, असा आरोप राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज कोल्हापूर (Kolhapur) येथे आयोजित महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्यात केला.

पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अरुण लाड (Arun Lad) आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ आज महासैनिक दरबार हॉल येथे प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil), ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant), कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ना. जयंत पाटील म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ज्या ठिकाणी जाऊन टीका करत आहेत, त्यातून महाविकास आघाडीला फायदाच होत आहे, राज्यातील महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे पाचही उमेदवार विजयी होतील. राजकारणाची एक हद्द असते मात्र यापलीकडे जावूनही विरोधकांनी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या कठीण काळातही भाजपने राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला. धार्मिक स्थळे उघडण्या संदर्भातही भाजपने राजकारण केल्याची टिकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER