हिंदूंच्या रक्ताची चटक लागलेल्या शिवसेनेच्या वाघिणीवर तुम्ही गप्प का? आचार्य तुषार भोसलेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

acharya-tushar-bhosale-and-uddhav-thakre

मुंबई :विधानसभा निवडणुकांनंतर (Assembly elections) पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्यावरून भाजपा आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांचे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करणं सुरू होतं. आता त्यावर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी भाष्य केले.

बंगालमध्ये दिवसाढवळ्या लोकशाहीचा जो खून केला जातोय, तो आम्ही किती दिवस बघायचा? त्यात आपल्या महाराष्ट्रातले लोक वाघीण म्हणतात आणि रक्तपातावर अवाक्षर काढत नाही ? त्या बंगालमध्ये सत्ता प्रस्थापित व्हायच्या आधी जर इतके रक्तरंजित दिवस हिंदूंना पाहायला मिळत असतील तर तो बंगाल आपल्या हिंदुस्थानात आहे की पाकिस्तानात, असा सवाल विचारावा लागेल. शिवसेनेची वाघीण बंगालमध्ये हिंदूंचे  रक्त पीत  असताना, आता शिवसेना गप्प का? असा सवाल भोसले यांनी उपस्थित केला .

निकालाच्या दिवशी ‘रडीचा डाव’ म्हणून  ट्विट करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हेसुद्धा यावर काहीच बोलत नाहीत, तेसुद्धा जाणीवपूर्वक धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेले आहेत. पण आम्ही सर्व जण बंगालच्या कार्यकर्ते आणि समर्थकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. कालीमाता त्यांना निश्चितच बळ देईल आणि प. बंगालवरील हे संकट लवकरच दूर करेल, असा आम्हाला विश्वास आहे, असेही आचार्य तुषार भोसले म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button