हारलेल्या सैन्यासोबत रात्र घालवणारी आणि तब्बल ३४ वर्ष सिंहासन सांभाळणारी नायजेरायची राणी अमीना !

Maharashtra Today

भारतासह जगभराच्या इतिहासात पराक्रमाच्या जोरावर इतिहासाच्या पानांमध्ये आपलं नाव लिहणाऱ्या अनेक स्त्रीयांना आपण ओळखतो. पराक्रम, जिद्द, मेहतन आणि बुद्धीच्या जोरावर अनेक महिलांनी पराभवाला यशात बदललंय. त्यापैकीच एक होती राणी अमिना.

त्यांच्या कौशल्याच्या जोरावर राज्याचा चोहोकडे विस्तार केला. किल्ल्याच्या तटबंदीपासून व्यापारी मार्गापर्यंत सर्वदिशेला त्यांनी साम्राज्याचा विस्तार केला. ‘जाजाऊ’ साम्रज्य आजही आफ्रिकेतल्या सर्वाधिक शक्तीशाली साम्राज्यांपैकी एक आहे.

आईकडून मिळाला लढवय्या वारसा

राजकुमारी अमिना यांचा जन्म १५३३ला झाला. नायजेरीयाच्या (Queen Amina of Nigeria)उत्तरीभागातील ‘जाजा’ क्षेत्रात त्यांचं बालपण गेलं. ‘बकवा द हाबे’ या राणीच्या पोटी अमिनाचा जन्म झाला. ज्या त्यांचे आजोबा जज्जाऊर नोहिर यांच्या मृत्यूनंतर साम्राज्यावर राज्य कारयच्या. जुन्या काळातील संदर्भानूसार जाजाऊचा अर्थ ‘माध्यम’ असा होतो.

लहानपणापासूनच ती सत्ताधारी होण्याचे गुण आत्मसात करत होती. आजोबांसोबत ती दरबारातील बैठकींना हजेरी लावायची. या बैठकांमध्ये बरेच राजकीय गुण तिने शिकून घेतले. वेळेसोबतच अमिनाच वय वाढत गेलं. वयाच्या सोळाव्या वर्षी तिनं आईच्या हातून साम्राज्य स्वतःच्या ताब्यात घेतलं. आता ती राणी झाली होती. जबाबदाऱ्या निभावणं, कुशल शासकाप्रमाणं राज्य करणं हे गुण तिनं आईसोबत राहून शिकले होते.

राजवाड्याच्या चार भीतींत त्या कधीच कैद झाल्या नाहीत. त्यांनी युद्धतंत्राचा अभ्यास केला. तलवार बाजीचं त्यांनी प्रशिक्षण घेतलं. लहान वयापासूनच लोक त्यांच्याकडे राणी म्हणून बघत आणि तसा आदर ही ते देत. सर्व सरकारी कामांमध्ये त्या स्वतः लक्ष घालत. राजकारणावरील त्यांची पकड पाहून भले भले लोक आवाक होवून जायचे. सोबतच सैन्याकी गुणही मिळवायला त्यांनी सुरुवात केली होती.

जाजाऊ साम्राज्याच्या हाबे बनण्याच्या मान

१५६६ अमिनांच्या आईचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अमिना यांच्या लहान भावाकडे राज्याची सर्व सुत्रं आली. अमिना यांचा लहान भाऊ ‘करामा’ जाजाऊ साम्राज्याचा नवा शासक नियुक्त झाला. करामाच्या शासन काळात जाजाऊ साम्राज्यानं आर्थिक प्रगती केली. सैन्यदल त्यांनी अधिक सक्षम केलं. जाजाऊची शेजारी राष्ट्रांवर पकड निर्माण झाली. त्यांच्या शासन काळात जाजाऊ प्रगती करत होता पण १९७६ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा कार्यकाळ केवळ दहाच वर्षाचा होता पण जाजाऊ साम्राज्यानं या काळात मोठी प्रगती साधली होती.

कारमांच्या मृत्यूनंर सिंहासनसाठी योग्य आणि सक्षम फक्त एक नाव होतं. अमिना यांचं. याच वर्षी त्यांनी सुत्र हातात घेतली. योग्य शासकाप्रमाणं राज्य करण्यासाठी राज्याची भरभराट होणं गरजेचं होतं ते करण्याची ताकद फक्त व्यापारी मार्गात असल्यामुळं त्यांनी व्यापारी मार्गांना अधिक सक्षम बनवण्याचा निर्णय घेतला.

व्यापारी मार्गावर शत्रु सैन्याच्या टोळ्या त्रास देत असत. राणी अमिना यांनी या मार्गांना सुरक्षित करण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात आणला. जे ऐकतील त्यांना सांगून आणि जे विरोधात होते, त्यांना पराभव करुन व्यापारी मार्ग सुरक्षित करुन घेतले. याचा मोठा फायदा साम्राज्याला झाला. वैभवात भर पडली. व्यापार तेजीत चालला. त्यामुळं सैन्यबळ वाढलं आणि येत्याकाळातील लढ्यासाठी सैन्यदल अधिक प्रगत झालं.

एक रात्र सोबत राहून दुसऱ्यादिवशी करायची हत्या

अमिना २० हजार सैनिकांच्या महाकाय सैनेच नेतृत्व करायच्या. राणी अमिना यांनी अधिकतर युद्ध स्वतः रणांगणावर शौर्य गाजवून जिंकली. व्यापारी मार्गांना मोकळीक दिल्यामुळं इतर शहरही अमिना यांच्या सुरक्षित राज्यात विलीन होत गेली आणि साम्राज्याचा विस्तार होत राहिला.

अमिना यांच्याबद्दल एक मान्यता अशी ही आहे की, त्या पराभूत सैन्यातील एका सैनिकासोबत एक रात्र काढायच्या आणि पुढच्या दिवशी त्याची हत्या करायच्या. अमिनांबद्दल इतर कुणाला काही कळू नये, यासाठी त्या असा निर्णय घ्यायच्या. त्यांच्या हातून कधीच सत्ता निसटू नये, अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी लग्नही केलं नाही.

त्या सलग ३४ वर्ष सत्तेवर होत्या. राज्याच्या सीमेच्या चारही दिशेला विस्तार केला. त्यांच्या कर्तबगारीची बरोबरी त्यांच्या घराण्यातल्या कुणालाच नंतर करता आली नाही.

अमिनांच्या भिंती

अमिना यांनी एखादं शहर जिंकलं की त्याला भिंतींनी घेराव घालायच्या. यामुळं तो प्रांत सुरक्षित होतो असा त्यांचा समज होता. अमिना यांनी निर्माण केलेल्या भिंती आजही नायजेरीयात पहायला मिळतात. १६१०मध्ये राणी अमिना यांचा लढता लढताच मृत्यू झाला. नायजेरीयातील संग्रहालयांमध्ये आजही त्यांच्या प्रतिमा आणि प्रतिकृती पाहायला मिळतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER