क्वारंटाईनच्या शिक्क्याची शाई उबजते : तक्रार

Madhu Goud Yaskhi - Quarantine Stamp

नवी दिल्ली : कोरोनाच्या (Corona) साथीमुळे बंद असलेली विमानसेवा सुरू झाली; मात्र सुरक्षा म्हणून विमानातून येणाऱ्या प्रवाशांच्या हातांवर ‘क्वारंटाईन’चा (Quarantine) शिक्का मारला जातो. या शिक्क्यासाठी वापरण्यात येणारी शाई उबजते, अशी तक्रार आहे.

काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी खासदार मधु  गौड याक्षी (Madhu Goud Yaskhi) यांनी रविवारी ट्विट करून त्यांच्या हातावर शिक्का मारल्यामुळे कसा परिणाम झाला याचा फोटो शेअर केला आहे. मधु याक्षी यांच्या हातावर मारण्यात आलेल्या शिक्क्याची  शाई उबजली (रिअ‍ॅक्शन झाले) आहे. मधु याक्षी यांनी याबद्दल केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांना ट्विटरवर टॅग करून तक्रार केली. ‘प्रिय हरदीप सिंह पुरी जी, परदेशातून भारतात आल्यावर विमानतळावर होम क्वारंटाईन होण्यासाठी हातावर शिक्का मारला जातो आहे. त्याच्या केमिकलकडे लक्ष द्या, माझ्या हातावर दिल्ली विमानतळावर शिक्का मारला होता. हातावर त्याचे ‘रिअॅक्शन’ झाले आहे.’ मधु यांच्या तक्रारीची दखल घेऊन हरदीप सिंह पुरी यांनीसुद्धा ट्विटरवरच उत्तर दिले – आपण ही बाब माझ्या लक्षात आणून दिली, त्याबद्दल आपला आभारी आहे.

याबद्दल विमानतळ अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सीएमडीसोबत चर्चा करणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्यांना ‘होम क्वारंटाईन’ होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची ओळख व्हावी यासाठी त्यांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चा शिक्का मारला जातो. देशात विमानसेवा सुरू झाली आहे. प्रत्येक विमानतळावर येणाऱ्या – जाणाऱ्या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो आहे. प्रवासी क्वारंटाईनच्या अवधीच्या आधी ते घरातून बाहेर पडले तर त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे लक्षात येईल.

याआधीही राज्यात मार्च महिन्यात लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी हातावर शिक्के मारण्यात आले होते. तेव्हाही ‘रिअॅक्शन’ची तक्रार आली होती. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनाही याचा सामना करावा लागला होता. त्यानंतर शिक्के मारणे बंद झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER