मनसेच्या परप्रांतियांच्या मुद्द्यावर बोट ठेवत युतीसाठी भाजपने घातली अट

Raj Thackeray-Chandrakant Patil

मुंबई :  मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. सर्वच पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. महापालिका निवडणुकीत मनसे – भाजप (MNS-BJP) एकत्र येण्याच्या चर्चांनाही ऊत आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवर तळमळीनं रिऍक्ट होतात. पण आमचं परप्रांतियांबाबतचं धोरण ते स्वीकारणार नाहीत. त्यांनी त्यांचं धोरण बदलायला हवं. त्यांनी परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असं पाटील म्हणाले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबदल दुमत नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

भाजपसोबत काडीमोड घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. तेव्हापासूनच मनसे भाजपची मैत्री होण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर, रणनीतीवर मनसे नेहमीच बोट ठेवत असते. जनतेचा आवाज मातोश्रीपर्यंत पोहचवण्यासाठी मनसे सदैव तत्पर असते. वेळप्रसंगी टीकाही करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER