व्लादिमीर पुतिनचा 100 अब्जांचा राजवाडाचा विडिओ होतो आहे वायरल, तुम्ही बघितला का ?

Vladimir Putin

मॉस्को :- रशियामध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांचे सर्वात मोठे शत्रू असणारे एलेक्सी नावलनी हे रशियात परतले असून त्यांनी पुन्हा एकदा पुतीन यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला आहे. नावलनी यांच्या नुकताच विषप्रयोग करण्यात आला आहे. त्यातून ते थोडक्याच वाचले आहेत. नावलनी हे पुन्हा रशियात परतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, नावलनी यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपल्या ब्लॉगमध्ये पुतीन यांच्याबद्दल अनेक गोप्यस्फोट केले आहेत. त्यात महिलांबाबतच्या संबंधाचाही उल्लेख आहे.

पुतीन हे आपल्या कथिल गर्लफ्रेन्डवर सरकारी तिजोरी रिकामी करत असल्याचा गंभीर आरोप नावलनी यांनी केलाय. इतकच नाही तर पुतीन हे आपली आधीची पत्नी आणि मुलीवरही मोठ्या प्रमाणात दौलतजादा करत असल्याचंही नावलनी यांनी म्हटलंय. पुतीन यांनी 100 अब्ज रुपयांचं घर बनवलं असून, ते काला सागर किनाऱ्यालगत आहे. या अलिशान घरात असंख्य सुख-सुविधा असल्याचंही नावलीन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं.

रशियाच्या दक्षिणेस काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर पुतीन यांनी मोठी संपत्ती घेतल्याचा आरोप नवलनी यांनी केला आहे. त्याचे इंटिरियर प्रख्यात कलाकारांनी डिझाइन केले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करताना त्याने दावा केला की जबरदस्त थ्रीडी इमेजमध्ये पुतीनच्या राजवाड्यात स्लॉट मशीन आणि डान्स मॅट, स्पा, जिम, स्विमिंग पूल, भूमिगत वाइन तळघर, भूमिगत बर्फाचा एक रिंक आहे.

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं अफेयर माजी ऑलिंपिक चॅम्पियन एलिना कबाएवा हिच्यासोबत असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. 37 वर्षीय एलिना हिने 2004च्या ऑलिम्पिक स्पर्धेत जिम्नॅशियममध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. तत्पूर्ण 2000 मध्ये तीन कास्य पदकाची कमाई केली होती. 1983 मध्ये उज्बेकिस्तानमध्ये जन्माला आलेल्या एलिनाचं नाव सुरुवातीला 2008 मध्ये पुतीन यांच्याशी जोण्यात आलं होतं. 2013 मध्ये पुतीन यांनी पत्नीशी काडीमोड घेतला आहे. त्यानंतर पुतीन यांनी आपल्या खासगी आयुष्याबाबत काहीही माहिती दिलेली नाही. 2016 मध्ये कबाएवा लग्नाच्या अंगठीसह दिसून आली होती.

Source :-Inshort

Source :- DW News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER