किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकले- रामगोपाल वर्मा

अर्णबच्या अटकेबाबत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी वडिलांसारखी हिंमत दाखवली

Ramgopal Verma

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. यावर – किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकले, अशी प्रतिक्रिया चित्रपट निर्माता – दिग्दर्शक रामगोपाल वर्मा याने दिली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत त्यांनी अर्णब गोस्वामी याने पैसे थकवल्याचा आरोप केला होता.

राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ते मत मांडतात. यावेळी त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली. म्हणाले – ही कारवाई पाहून मला आनंद झाला. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखवली.

एका किंचाळणाऱ्या बोक्याला त्यांनी पिंजऱ्यात टाकलं. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचे सांगण्यात येते आहे. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER