केंद्राऐवजी स्मशानभूमीला साकडे घाला; सदाभाऊ खोत राज्य आघाडी सरकारवर टीका

Sadabhau Khot-MVA

सांगली : मराठा आरक्षण मुद्द्यावरून रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. आघाडी सरकार कोरोनाच्या महालात झोपलेले भुताटकी सरकार आहे, अशी टीका खोत यांनी माध्यमांशी सवांद साधताना केली आहे.

मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता केंद्राला साकडे घालण्याचा उद्योग या सरकारकडून करण्यात येत आहे. मग दीड वर्ष तुम्ही झोपा काढत होता का? या सरकारने केंद्राऐवजी स्मशानभूमीला साकडे घातले पाहिजे. सरकार विरोधात कोणी आंदोलन करणार असेल तर त्याला कोरोनाची भीती दाखवण्याचे काम या भुताटकी सरकारकडून करण्यात येते, अशी टीका खोत यांनी केली.

निवडणूका होत असतील तर…

यंदाच्या पंढरपूर वारीला राज्य सरकारने योग्य ती भूमिका घेऊन परवानगी देणे गरजेचे आहे. कारण राज्यात सगळ्या निवडणुका पार पडत असेल तर पंढरीच्या वारीला अडचण काय? असा सवाल करत वारकरी संप्रदायाने यंदा वारी काढण्याबाबतचा निर्णय घ्यावा. रयत क्रांती संघटना सोबत असेल, असे खोत म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button