महाविकास आघाडीला धक्का; स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत

Raju Shetty

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत. तसेच स्वाभिमानी स्वतंत्र निवडणुका लढवण्याची शक्यता आहे . केंद्रानंतर आघाडी सरकारनेही आम्हाला फसवले, असा आरोप शेट्टी यांनी केला . तत्पूर्वी राज्यातील सरकार शेतकरीविरोधी आहे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करत आहे.

शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं. या सरकारला पाठिंबा दिल्याचा आपल्याला मोठा पश्चात्ताप होत आहे. आता लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशा शब्दांत शेट्टी यांनी सरकारविरोधी रणशिंग फुंकले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button