राज्य सरकारला धक्का, मनसुख हिरेन प्रकरणही एनआयएकडे

NIA - Mansukh Hiren - Maharastra Today

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren) मृत्यू प्रकरणात राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला होता. मात्र आता केंद्र सरकारच्या गृहविभागाने अधिसूचना जरी करुन हा तपास एनआयएकडे (NIA -National Investigation Agency) वर्ग केला आहे. त्यामुळे राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.

आज केंद्रीय गृह मंत्रालयाकडून याबाबत अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला सापडला होता. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही कायम आहे. त्यांनी आत्महत्या केली की त्यांच्यासोबत घातपात झाला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER