वसई-विरारमध्ये शिवसेनेला धक्का; भूषण किणी यांचा भाजपप्रवेश

मुंबई : वसई-विरार महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आपली ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. बहुजन विकास आघाडीचे शिरसाड ग्रामपंचायतीचे १० वर्षे सरपंचपद भूषवलेले व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, आगाशी विरार अर्नाळा शिक्षण संस्थेचे पदाधिकारी भूषण किणी (Bhushan Kini) यांनी व काही शिवसेनेच्या (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपने बहुजन आणि शिवसेनेची डोकेदुखी वाढविली आहे.

वसई-विरार महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा प्रभारी आमदार प्रसाद लाड यांनी वसई-विरारचा दौरा केला. सहप्रभारी जयप्रकाश ठाकूर, भरत राजपूत आणि जिल्हाध्यक्ष राजन नाईक, प्रवीण गावडे, राजू म्हात्रे, मनोज बारोट, महेंद्र पाटील, माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या उपस्थितीत नालासोपारा येथील बालाजी बँक्वेट हॉलमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार लाड यांनी बहुजन विकास आघाडीचे नाव न घेता आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. ते म्हणाले की, आजही भाजपला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावले जात आहे. निवडणूक कार्यालये बंद करा म्हणून धमक्या दिल्या जात आहेत. शिवसेनेबरोबरच बहुजन विकास आघाडीनेसुद्धा आमच्या धडाडीचा धसका घेतला आहे. त्याद्वारे दहशत निर्माण करणे आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button