शिवसेनेला धक्का : उपशहरप्रमुख मेंनेंजिस सातन पुन्हा काँग्रेसमध्ये परतले

उपशहरप्रमुख मेंनेंजिस सातन पुन्हा काँग्रेसमध्ये परतले

मीरारोड : काशीमीरा भागातील शिवसेनेचे (Shiv Sena) उपशहरप्रमुख मेंनेंजिस सातन ह्यांनी त्यांच्या समर्थकांसह काँग्रेस मध्ये प्रवेश केला. २०१७ च्या पालिका निवडणुकी वेळी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असताना सातन ते शिवसेनेत गेले होते.

काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांनी सातन व त्यांच्या समर्थकांना काँग्रेस (Congress) मध्ये पुन्हा प्रवेश दिला . जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, नगरसेवक अनिल सावंत, अश्रफ शेख, गीता परदेशी, रुबिना शेख, एस. ए. खान, महिला अध्यक्ष लीला पाटील, युवक अध्यक्ष दीप काकडे, प्रवक्ते प्रकाश नागणे उपस्थित होते.

अपेक्षा ठेवत पक्षात येणाऱ्यांनी प्रथम समाज कार्याच्या माध्यमातून जनसमस्या सोडवत लोकांना जोडण्याचे काम करावे, त्यासाठी मेहनत महत्वाची आहे, कार्यकर्त्यांमधूनच नेते घडत असतात. राजकीय स्वार्थासाठी विचारधारेला पायदळी तुडवत इतर पक्षात जाणाऱ्याना जनता लक्षात ठेवते, कर्म करीत रहा फळाची अपेक्षा करत बसू नका, असा सल्ला मुझफ्फर हुसेन यांनी कार्यकर्त्यांना दिला.

मनोगत व्यक्त करताना सातन म्हणालेत, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विश्वासावर मी शिवसेनेत गेलो . परंतु महापालिकेतील सेनेचे पदाधिकारी माझ्या समर्थक कार्यकर्त्यांनी आणलेल्या नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याकडे दुर्लक्ष करत आहेत . सेनेत राहून जनतेची कामे होत नसल्याने पुन्हा स्वगृही काँग्रेस मध्ये प्रवेश करतो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER