शिवसेनेला धक्का ? जळगावमध्ये फुटलेल्या नगरसेवकांविरोधात भाजपची याचिका

जळगाव :- नुकताच झालेल्या जळगाव महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या भाजपला मोठा धक्का बसला होता. महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या २७ नगरसेवकांनी ऐनवेळी पक्षाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. आणि भाजपची असलेली सत्ता शिवसेनेच्या हातात गेली. आता मात्र फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी भाजपाने जोरदार राणनीती आखली आहे. भाजपने पक्षादेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत या सर्व नगरसेवकांना अपात्र ठरवावे यासाठी आज नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे.

महापौर व उपमहापौर पदांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या २७ नगरसेवकांनी पक्षाचा आदेश धुडकावत शिवसेनेशी हातमिळवणी केली होती. त्याचा परिणाम म्हणजे भाजपच्या  महापौरपदाच्या  उमेदवार प्रतिभा कापसे व उपमहापौर पदाचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पराभव झाला होता. महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन व उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर कुलभूषण पाटील हे विजयी झाले होते. या नगरसेवकांनी पक्षादेशाचा भंग केल्याने त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे याकरिता जळगाव मनपा भाजप गटनेता भगत बालानी यांनी आज दुपारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे याचिका दाखल केली.

ही बातमी पण वाचा : भाजप आणि पवारांमध्ये जवळीक वाढली, शहानंतर आता नारायण राणेंची पवारांसोबत भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button