महाविकास आघाडीला धक्का; औरंगाबादनंतर नाशिकमधेही शिवसेनेकडून स्वबळाची हाक

Nashik Municipal Corporation - Shiv Sena

नाशिक : मंगळवारी शिवसेनेच्या औरंगाबादमधील स्थापनेच्या ३६ व्या वर्धापन दिनी आयोजित ऑनलाईन मेळाव्यात शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. आता त्यापाठोपाठ नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) निवडणुकीसाठीही स्वबळाचा घोषणा केली गेली आहे. एकीकडे राज्यात शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi) असताना शिवसेनेने महापालिका निवडणुकांसाठी स्वबळाची हाक दिल्याने महाविकास आघाडीला हा हा मोठा धक्का मानला जात आहे.

आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना सगळ्या जागा स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याची माहिती शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आज दिली. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आजपासून पाच दिवसांच्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याची माहिती बडगुजर यांनी दिली.

नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी सुधाकर बडगुजर यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. बडगुजर यांनी महानगरप्रमुख पदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले. माजी आमदार बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र ती पोकळी भरुन काढण्यासाठी शिवसेनेने सुधाकर बडगुजर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीनेही स्वबळाची तयारी केली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्ष संघटना अधिक बळकट करुन कामाला लागावे. तसेच वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल याची वाट न बघता प्रसंगी नाशिक महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचीदेखील तयारी ठेवा, असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिकचा पुढचा महापौर शिवसेनेचा होईल, असा दावा केला आहे. त्यानंतर नाशिकच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली आहे. राऊत कोणाच्या भरवश्यावर हा दावा करत आहेत, असा प्रश्न विरोधकांमध्ये उपस्थित झाला आहे. तिकडे मनसेही नाशिक मनपा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. भाजपनं मनसेचे अनेक नगरसेवकगळाला लावले. त्यामुळं स्थानिक पातळीवर मनसैनिकांमध्ये भाजपबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, असं असलं तरी अंतिम निर्णय राज ठाकरेंच्या कृष्णकुंजवरच घेतला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button