गृहमंत्री देशमुखांना उच्च न्यायालयाचा धक्का; परमबीर सिंग यांच्या आरोपाचा तपास सीबीआयकडे

Maharashtra Today

मुंबई: मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे.  अनिल देशमुख(Anil Deshmukh) हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही असं मतही उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात यापूर्वी ३१ मार्चला युक्तिवाद झाला होता. परमबीर सिंग यांच्यावतीनं वकील विक्रम ननकानी यांनी बाजू मांडली. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती.  जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.  याप्रकरणी आणखी तीन याचिकावरही सुनावणी झाली. परमबीर सिंग यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका सोबत जयश्री पाटील यांच्या लेखी याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढल्या. हे अभूतपूर्व प्रकरण आहे. खुद्द मुंबई पोलिस आयुक्तांनीच गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याने आम्ही प्राथमिक चौकशीचा आदेश देत आहोत, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर या मधील अहवालाच्या आधारे जी काही कार्यवाही कायद्यानुसार करायची असेल, त्याचा निर्णय सीबीआय संचालकांनी घ्यावा, असे आदेश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने दिलेल्या सीबीआय चौकशी आदेशामुळे देशमुख यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button