हर्षवर्धन पाटील यांना धक्का; भरत शहा यांचा सर्व पदांचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या संपर्कात

Harwardhan Patil - Maharashtra Today
Harwardhan Patil - Maharashtra Today

पुणे : माजी मंत्री आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे खंदे समर्थक भरत शहा यांनी तडकाफडकी त्यांच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिला असल्याचे शहा सांगत आहेत. मात्र यात मोठे राजकारण दडल्याची चर्चा आहे. कारण भरत शहा यांनी राजीनामा दिल्यानंतर आज राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या समर्थकांनी भरत शहा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे शहा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. ते राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

इंदापूर अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक, इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक इत्यादी पदावर ते सध्या कार्यरत होते. शहा यांच्या राजीनाम्याने  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसला असून, इतर राजकीय समीकरणे जुळतात की काय? ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? अशी चर्चा सध्या तालुक्यात सुरू झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button