केजरीवालांना धक्का; ‘आप’च्या वरिष्ठ आमदाराने केली दिल्लीत राष्ट्रपती राजवटीची मागणी

Maharashtra Today

नवी दिल्ली :- राजधानी दिल्लीत कोरोनाची (Delhi Coronavirus) परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. दररोज कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीती आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ठप्प पडली आहे. त्यामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी राजधानी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात (Presidential rule in Delhi)यावी, अशी मागणी आम आदमी पक्षाचे आमदार शोएब इक्बाल (Shoaib Iqbal) यांनी केली आहे. शोएब इक्बाल यांनी केलेल्या या मागणीमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. तर दुसरीकडे भाजपनेही त्यांच्या मागणीचे समर्थन केले आहे. शोएब इक्बाल हे दिल्लीतील मटिया महाल मतदारसंघाचे आमदार आहेत.

शोएब इक्बाल यांची राष्ट्रपातीची राजवटीची मागणी केजरीवाल सरकारसाठी जबर धक्का मानला जात आहे. अगोदरच केंद्र सरकारने विशेष कायद्याद्वारे केजरीवाल सरकारचे बहुतांश अधिकार हे नायब राज्यपालांना यांच्याकडे सोपवले आहे. त्यामध्ये आता स्वपक्षाच्या आमदाराने राष्ट्रपती राजवटीची मागणी केल्याने ‘आप’ची आणखीनच गोची झाली आहे.

विशेष म्हणजे आता भाजपनेही शोएब इक्बाल यांच्या मागणीचे पुरजोर समर्थन केले आहे. शोएब इक्बाल हे सहावेळा आमदार म्हणून विजयी झाले आहेत. दिल्लीची आताची परिस्थिती बघता त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने केलेली मागणी योग्य आहे. दिल्लीतील आरोग्य यंत्रणा नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे दिल्लीचा कारभार केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याची वेळ आली आहे. दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे, असे दिल्ली भाजपचे प्रवक्ते हरीश खुराना यांनी म्हटले.

दिल्लीत कोणतीच यंत्रणा सक्षम राहिलेली नाही. एकही काम धड होत नाही. लोकांचे म्हणणं ऐकायला दिल्लीत कोणीही नाही. दिल्लीत बेड, ऑक्सिजन किंवा औषधं उपलब्ध नाही. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत वेळीच राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही तर रस्त्यांवर मृतदेहांचे खच पडतील, अशी भीतीही शोएब इक्बाल यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button