पूर्वेश सरनाईक ईडीच्या चौकशीला गैरहजर, आजारी असल्याचे कारण पुढे

Purvesh Sarnaik

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांचे धाकटे सुपुत्र पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) हे ईडीच्या रडारवर असून त्यांना आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र आजारी असल्याचे सांगत पूर्वेश सरनाईक आज ईडीच्या कार्यालयात गेले नाही. आजारी असल्यामुळे चौकशीला हजर राहू शकणार नसल्याचं पत्र पूर्वेश सरनाईक यांनी दिलं आहे. चार दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक आणि विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.

पूर्वेश सरनाईक यांना ९ डिसेंबर रोजी ईडीकडून समन्स बजावण्यात आलं होतं. यामध्ये १४ डिसेंबर म्हणजे आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत ही चौकशी करण्यात येत आहे. तसेच यात आणखी काही परदेशी व्यवहारही झाले आहेत, याचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे. मोठ्या मुलापाठोपाठ धाकट्या मुलामागेही ईडी चौकशी लागल्यामुळे सरनाईकांची डोकेदुखी वाढली होती.

दरम्यान, आपल्याला ताप आणि खोकला आहे. डॉक्टरांनी आपल्याला आराम करायचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आपण आज चौकशीसाठी येऊ शकत नाही, असं पत्र पूर्वेश सरनाईक यांनी आज ईडीच्या अधिकाऱ्यांना दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER