पाणीपुरवठा मंत्री ना.संजय बनसोडे यांनी मागितला अंडर ड्रेनेज साठी प्रस्ताव

विविध विकास साठी केली पाहणी

पूर्णा :- तालुका प्रतिनिधी परभणी शहर महानगरपालीकेच्या वतीने शहराची वाढती लोकसंख्येच्या दृष्टीने शहरात विकास कामे करण्यासाठी तसेच शहरात अंडर ड्रेनेज योजना लागू करण्यासाठी पाणी पुरवठामंत्री ना. संजय बनसोडे यांनी भेट देवून अंडर ड्रेनेजच्या प्रस्ताव देण्यासाठी सुचना केली. हा प्रस्ताव आपल्या स्तरावर मंजुर करून घेण्याबाबत सहकार्य दर्शविले.

या प्रसंगी पूर्णा चे माझी उपाध्यक्ष नगरसेवक हाजी खुरेशी यांनी विश्रामग्रहावर ना.बनसोडे यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष , तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. हाजी कुरेशी यांचेशी चर्चा करतांना ना.संजय बनसोडे यांनी पाण्याच्या व धरण बांधण्याच्या बाबतीमध्ये चर्चा करत धरणातील पाणी कमी होऊ देणार नाही व धरणांमध्ये असलेल्या पाण्याचे सुयोग्य नियोजन केले जाईल ज्यामुळे परिसरात पाण्याची टंचाई भासणार नाही. असे सांगितले तसेच प्रस्ताव देण्याबाबत पुनरूच्चार केला.