शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड : पंजाबराव पाटील

शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची टीका

मुंबई : राज्यात पुन्हा निर्माण झालेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बळीराजालाही मोठा फटका बसला होता. मात्र तो अजुन यातून सावरला नाही तर राज्य सरकारने मागील युनिटच्याआधारे अंदाजे वीजबिल पाठवलंं. त्यामुळे शेतकऱ्यांवर या वीज बिलाचा एक बोजा पडला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील (Punjabrao Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला.

कोरोनामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्यामध्ये राज्य सरकार शेतकऱ्यांना चुकीच्या पद्धतीने वीजबिलाच्या वसुलीतून लुटण्याचं काम करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शब्दाचे पक्के होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र लबाड असल्याचं म्हणत पंजाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे .

कोरोनाकाळात शेतकऱ्यांनी बागायतीमध्ये केलेले उत्पादन त्यांना लॉकडाऊनमुळे बाजारात पाठवता आलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठा तोटा झाला होता. त्यात आता अव्वाच्या सव्वा आलेल्या लाईटबिलमुळे त्यांच्या कर्जामध्ये आणखी भर पडली आहे.

कोरोनाकाळात शेतकऱ्याला फार मोठं नुकसान झालं आहे आणि राज्य सरकार वीजबिलाच्या माध्यामातून सरकारची लुट सुरू आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सध्या कोणीही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल भरू नये, असे आम्ही जाहीर करत असल्याचं पंजाबराव पाटील म्हणाले. त्यासोबतच मुख्यमंत्री लबाड आहेत त्यांनी गेल्या वर्षी नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजार रूपये देण्याची घोषणा केली होती मात्र एक कवडीही मिळाली नसल्याचे पंजाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER